Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुंकू लाव, मगच बोलतो...; महिला पत्रकारांबाबत संभाजी भिडेंचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 06:17 IST

भिडे यांनी बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

मुंबई : ‘तू आधी कुंकू लाव मगच मी बोलतो’ असे उत्तर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी बुधवारी एका महिला पत्रकाराला मंत्रालयात दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भिडे यांनी बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर या भेटीबद्दल एका महिला पत्रकाराने प्रश्न केला असता ते म्हणाले, की या देशातील प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे स्वरुप असते. भारतमाता विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव मगच मी तुझ्याशी बोलतो. 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आपण देव, देश आणि धर्माच्या कामाविषयी भेटलो, त्याचा तपशील सांगण्याची गरज नाही असे भिडे म्हणाले. माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते असे वक्तव्य करून काही वर्षांपूर्वी  भिडे यांनी वाद ओढावून घेतला होता. आता या विधानावरुन नवीन वाद होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :संभाजी भिडे गुरुजी