पहिल्या टप्प्यात शिवशाहीची २५ हजार घरे
By Admin | Updated: November 22, 2015 02:56 IST2015-11-22T02:56:56+5:302015-11-22T02:56:56+5:30
मुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे उभारणीसाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प (एसपीपीएल) कंपनीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात २५ हजार घरे उभारण्यासाठी

पहिल्या टप्प्यात शिवशाहीची २५ हजार घरे
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे उभारणीसाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प (एसपीपीएल) कंपनीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात २५ हजार घरे उभारण्यासाठी लागणारे अर्थसाहाय्य मिळविण्यासाठी शिवशाही कंपनीने हुडकोकडे प्रस्ताव सादर केला आहे. ८ प्रकल्पांसाठी हुडकोने अर्थसाहाय्य देण्यास मंजुरी दिल्यास शिवशाहीला एमएमआर क्षेत्रात हजारो घरे उभारता येणार आहेत.
एमएमआर क्षेत्रातील दोन खासगी जमीन मालकांनी प्रत्येकी २00 एकर जमिनीवर प्रकल्प साकारण्याचे प्रस्ताव एसपीपीएलकडे सादर केले आहेत. त्यानुसार कंपनी या जमिनीवर गृहप्रकल्प राबविण्याचा विचार करत आहे. या प्रकल्पाला इतर खासगी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे शक्य नसल्याने कंपनीने हुडको या वित्तीय संस्थेकडे प्रस्ताव सादर केला आहे. एसपीपीएलने हुडकोकडे ८ प्रस्ताव सादर केले आहेत. पहिल्या टप्प्यात एसपीपीएल कंपनीने ८ जमिनींच्या जागेवर प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हुडकोने अर्थसाहाय्य दिल्यास एसपीपीएलला प्रकल्प राबविणे शक्य होणार आहे. या जमिनींवर २५ हजार घरे उभारता येणार असून, त्यापैकी काही घरे जमीन मालकांना द्यावी लागणार असल्याची माहिती कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिली. तसेच जमीन मालकांच्या मोबदल्याचा निर्णय अद्याप झाला नसल्याने पहिल्या टप्प्यात किती घरे कंपनीला मिळतील, ते अधिक ठोसपणे सांगता येणार नसल्याचे, या अधिकाऱ्याने सांगितले.