सायन रुग्णालयात राज्यातील पहिला बालरोग विभाग
By Admin | Updated: November 29, 2014 00:43 IST2014-11-29T00:43:01+5:302014-11-29T00:43:01+5:30
लहान मुलांमध्ये रक्ताचे आजार, कर्करोग असल्यास बालरोग विभागातच त्यांच्यावर उपचार केले जातात.

सायन रुग्णालयात राज्यातील पहिला बालरोग विभाग
मुंबई : लहान मुलांमध्ये रक्ताचे आजार, कर्करोग असल्यास बालरोग विभागातच त्यांच्यावर उपचार केले जातात. रक्ताचे आजार असणा:या मुलांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्यामुळे यांच्या उपचारासाठी 2क् खाटांचा एक वेगळा बालरोग रक्तदोष - कर्करोग विभाग महाराष्ट्रात पहिल्यांदाच सायन रुग्णालयात सुरू करण्यात आला आहे. या विभागाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
रक्ताचे आजार अथवा कर्करोग असणा:या मुलांना उपचार देणारी वैद्यकीय शाखा ही सध्या जगभरात वाढत आहे. यावेळीच सार्वजनिक खासगी भागीदारीतून सायन रुग्णालयामध्ये हा विभाग सुरू केल्याने त्याचा अनेक लहान रुग्णांना फायदा होणार आहे. चेरिश लाईफ इंडिया फाऊंडेशनच्या ब्लांच यांनी विभागासाठी अडीच कोटी रुपयाचे सहकार्य केले आहे. या विभागात बोनमॅरो ट्रान्सप्लॉण्ट ही पहिल्यांदाच महापालिकेच्या रुग्णालयामध्ये केले जाणार आहे.
समाजामध्ये असणा:या रुग्णांना ज्याची गरज आहे, ते उपचार त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय सतत प्रयत्नशील आहेत, असे डॉ. सुपे यांनी सांगितले.
या विभाग 2क् खाटांचा असून 4 खाटा या केमो थेरपी घेत असलेल्या हायरिस्क गटासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या मुलांना संसर्ग होऊ नये म्हणून 4 खोल्यांमध्ये चार खाटा ठेवण्यात आल्या असून हवा फिल्टर करण्यासाठी फिल्टर बसवण्यात आले आहेत. 5 खाटा या कर्करोग रुग्णांसाठी (लो रिस्क) आहेत. 6 खाटा या रक्तदोष असणा:या रुग्णांसाठी असून 1 खाट ही बोन मॅरोच्या रुग्णासाठी आहे. तर 4 खाटा या डे केअर साठी राखीव आहेत. लहान मुलांना या विभागात आल्यावर प्रसन्न, आनंदी वाटावे म्हणून कार्टूनची चित्रे भिंतीवर काढण्यात आली आहे. गुलाबी रंगाचा वापर विभागात करण्यात आला आहे, असे डॉ. मंगलानी यांनी सांगितले.
याप्रसंगी सायन रुग्णालयात बालरोग विभाग स्थापन करणारे डॉ. एम. आर. लोकेश्वर, प्रमुख वैद्यकीय रुग्णालये आणि वैद्यकीय शिक्षण संचालिका डॉ. सुहासिनी नागदा, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, केईएम रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. ग्वालानी, फाऊंडेशनच्या ब्लाँच सलानडा उपस्थित होते.
मुलांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढतेय
च्गेल्या काही वर्षात लहान मुलांत कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. दहा वर्षापूर्वीर्पयत एकूण कर्करुग्णांपैकी लहान मुलांना कर्करोग होण्याचे प्रमाण 2.5 टक्के इतक होते.
च्आता ही संख्या 5.5 टक्के इतकी झाली आहे. टाटा मेमोरियल रुग्णालय दरवर्षी 2 हजार तर सायन रुग्णालयात दरवर्षी 8क् ते 1क्क् लहान कर्करुग्णांना तपासले जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त देशमुख यांनी सांगितले.