Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या पोटातून धावणारी पहिली मेट्रो येणार नोव्हेंबर २०२० मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 02:43 IST

एकूण ३१ गाड्या येणार : पुढील महिन्यापासून निर्मितीला सुरुवात

मुंबई : कुलाबा वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मागिकेवर धावणाऱ्या मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे (एमएमआरसीएल) देण्यात आली आहे. या मार्गिकेसाठी आठ डब्यांच्या एकूण ३१ मेट्रो बनविण्यात येणार आहेत. यातील पहिली मेट्रो नोव्हेंबर, २०२० पर्यंत मुंबईमध्ये येणार असल्याचेही सांगण्यात आले.

एमएमआरसीएलने हे काम ‘अ‍ॅलस्टॉम ट्रान्सपोर्ट इंडिया लिमिटेड’ या कंपनीला दिले आहे. मेट्रो-३ या संपूर्णत: भूमिगत मेट्रो मार्गिकेला ‘अ‍ॅक्वा लाइन’ असे संबोधले जाणार आहे. या डब्यांची रंगसंगती, तसेच डब्यांची आंतर-बाह्य संरचना नावाला साजेशी करण्यात येणार आहे.केंद्र शासनाच्या ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेप्रमाणे मेट्रो-३ मार्गिकेच्या सर्व गाड्यांची निर्मिती अ‍ॅलस्टॉम इंडिया यांच्या श्री सिटी, आंध्र प्रदेश येथील कारखान्यात होणार आहे. मेट्रो-३ चे डबे अद्ययावत असतील, तसेच विनाचालक कार्यन्वयनासाठी सक्षम असतील, असे एमएमआरसीने स्पष्ट केले आहे. मेट्रो-३ द्वारे प्रवाशांना आरामदायी, सुखकर, वेगवान प्रवास करणे शक्य होईल; कार्यान्वित झाल्यावर मेट्रो-३ मुंबईची नवीन जीवनवाहिनी ठरेल, असा विश्वास एमएमआरसीने व्यक्त केला आहे.एमएमआरसीएलने मेट्रो-३ मार्गिकेवर धावणाºया मेट्रोच्या डब्यांच्या प्रतिकृतीचे अनावरण आॅगस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले होते. आता प्रत्यक्षात मेट्रो सुरू होण्याची प्रतीक्षा आहे़असा असेल मेट्रोचा रंगगतिमान आणि सतत जागते राहणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाºया मुंबईची प्रेरणा घेऊन मेट्रो-३ मार्गिकेवर धावणाºया मेट्रोचे डबे डिझाइन केले आहेत. एमएमआरसीएलने टिष्ट्वटरद्वारे या मेट्रोचा फोटोही टिष्ट्वट केलाआहे. मुंबईचा समुद्र आणि वाहत्यापाण्याचा ताजेपणा आणि वेगवान प्रवाह यापासून प्रेरणा घेऊन या डब्यांचीरंगसंगती ठरविण्यात आली आहे. यामध्ये फिका हिरवा (अ‍ॅक्वा ग्रीन) आणि फिका पिवळा (बेज) या रंगांचा वापर करण्यात आला आहे़ त्यापैकी हिरवा रंग समुद्राच्या लाटांचा प्रवाहीपणा, ताजेपणा आणिवेग, तसेच पिवळा रंग हा आरामदायी प्रवासाचे प्रतीक आहे, असे एमएमआरसीएलने स्पष्ट केले आहे.मेट्रो डब्यांची खास वैशिष्ट्येच्प्रवाशांसाठी उद्घोषकांचा वापर.च्सुरक्षित आरामदायी प्रवासासाठी संपूर्णत: वातानुकूलित व आर्द्रता नियंत्रण यंत्रणा.च्प्रवाशांच्या मनोरंजनासाठी व जाहिरातींसाठी एलसीडीचा वापर.च्मार्गिकेचा डिजिटल नकाशा.च्अतिशय सुंदर बैठक व्यवस्थेसह उभे राहून प्रवास करणाऱ्यांसाठी खांबांची व्यवस्था.च्दिव्यांग प्रवाशांच्या सोईसाठी व्हीलचेअर ठेवण्यास स्वतंत्र व्यवस्था.च्सुखकर प्रवासाच्या अनुभूतीसाठी अद्ययावत एअर सस्पेन्शनचा वापर.च्प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक डब्यात सीसीटीव्हीची सुविधा.च्आगीपासून संरक्षणासाठी प्रत्येक डब्यात अग्निशमन, धूर व अग्निशोधक यंत्रणा.च्आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी व ट्रेन नियंत्रक यांच्यात संवाद साधण्यासाठी ध्वनी संवाद (व्हॉइस कम्युनिकेशन) यंत्रणा. 

टॅग्स :मुंबईमेट्रो