Join us  

Ganesh Galli Cha Raja 2019: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन; अयोध्येच्या राम मंदिराची साकारली प्रतिकृती 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 8:38 PM

Ganesh Galli Cha Raja 2019 : लालबागमधील सर्वात पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या या मंडाळाचे यंदा 92 वे वर्षे आहे

मुंबई -  मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन सोहळा पार पडला. यावेळी राजाची मूर्ती प्रभू श्रीरामाच्या अवतारात दाखविण्यात आली आहे. त्यासाठी अयोध्येतील राममंदिराची प्रतिकृती गणेश मंडळाकडून उभारण्यात आली आहे. गणेश गल्लीतील राजाला पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने गणेशभक्त उपस्थित राहत असतात. दरवर्षी येथील वेगवेगळ्या प्रतिकृतींमुळे हे मंडळ प्रसिद्ध आहे. 

लालबागमधील सर्वात पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या या मंडाळाचे यंदा 92 वे वर्षे आहे. 1928 साली लालबाग सार्वजनिक उत्सावाची स्थापना होऊन प्रथम 5 दिवसांचा गणपती विराजमान होत असे. 1942 पासून या उत्सवकार्याला महत्व प्राप्त होऊ लागले. विविध देखावे आणि लोक जागृतीचे केंद्र स्थान झालेल्या या मंडळाकडून उत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम होऊ लागले. यंदा मंडळाकडून उत्तर प्रदेशातील अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. 

 

टॅग्स :गणेश गल्लीचा राजागणेश मंडळ 2019गणेशोत्सवगणेश महोत्सव