राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहिर
By Admin | Updated: March 30, 2015 00:25 IST2015-03-30T00:25:23+5:302015-03-30T00:25:23+5:30
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपली पहिली जाहीर करताना राष्ट्रवादी काँगे्रसने घराणेशाहीला प्राधान्य

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहिर
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपली पहिली जाहीर करताना राष्ट्रवादी
काँगे्रसने घराणेशाहीला प्राधान्य देऊन नेरूळ व सीवूडमधील ७ उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये उपमहापौर अशोक गावडे, त्यांची कन्या सपना गावडे व महापौर सागर नाईक यांचे सासरे तथा नगरसेविका रेखा म्हात्रे यांचे पती विनोद म्हात्रे यांचा
प्रामुख्याने समावेश आहे.
पक्षाकडून काही नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार असे सांगून पक्षाने काही प्रभागामध्ये एमबीए, वकील, शिक्षक व इतर सुशिक्षितांना संधी दिली जाईल, असे जाहीर केले आहे. मात्र, माजी
खासदार संजीव यांनी शनिवारी नेरूळ प्रभाग ९६ मधून गणेश भगत, ९७ मधून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात सहनिबंधक व डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे प्रशासक असलेले डी. डी. कोलते, ९८ मधून अॅड. सपना गावडे, १०८ मधून विशाल डोळस, प्रभाग १०९ मधून उपमहापौर अशोक गावडे यांच्या नावांची घोषणा केली.
तसेच प्रभाग ११० मधून महापौर सागर नाईक यांचे सासरे तथा
विद्यमान नगरसेविका रेखा म्हात्रे यांचे पती विनोद म्हात्रे यांना तर १११ मधून माजी परिवहन सभापती गणेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली. या
उमेदवारांच्या प्रचारास सुरवात करताना नाईक यांनी शहरात केलेली विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.
मागील २० वर्षांमध्ये पक्षाने शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून त्यांनाच प्रचारामध्ये प्राधान्य देण्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उमेदवारांसह कार्यकर्ते
मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (प्रतिनिधी)