आजच्या दिवशी मुंबईत धावली होती पहिली घोडा गाडी
By Admin | Updated: May 9, 2016 13:32 IST2016-05-09T13:32:49+5:302016-05-09T13:32:49+5:30
मुंबईत घोडागाडीचा प्रवास आता जवळपास बंदच झाला आहे. घोडा गाडीत बसण्याचा एक वेगळा आनंद असतो म्हणून अनेकजण चौपाटीवर जाऊन घोडागाडीत बसण्याचा आनंद घेत होते.

आजच्या दिवशी मुंबईत धावली होती पहिली घोडा गाडी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - मुंबईत घोडागाडीचा प्रवास आता जवळपास बंदच झाला आहे. घोडा गाडीत बसण्याचा एक वेगळा आनंद असतो म्हणून अनेकजण चौपाटीवर जाऊन घोडागाडीत बसण्याचा आनंद घेत होते. पण न्यायालयाच्या निर्णयानंतर घोडागाडीचा वापर आता बंदच झाला आहे.
आजच्या दिवशी ९ मे १८७४ रोजी मुंबईच्या रस्त्यावर पहिली घोडा बस गाडी धावली होती. परेल ते कुलाबा या मार्गावर पहिली घोडा बस गाडी धावली होती. त्याकाळी गाडया नव्हत्या तेव्हा घोडागाडी मुंबईतील प्रवासाचे प्रमुख साधन होते.
धनिकवर्ग त्याकाळी घोडा गाडीचा प्रामुख्याने वापर करत असे. घोडागाडीतून फिरणारी व्यक्ती म्हणजे श्रीमंत असा एक समज होता. परेल ते कुलाबा मार्गावर पहिली घोडा बस गाडी धावली होती. त्या घोडा बस गाडीला सहा ते आठ घोडे जोडले होते.
काही महिन्यांपूर्वी मुंबईत रस्त्याखाली गडप झालेले ट्रामचे ट्रॅक सापडले होते. त्याचबरोबर ९ मे हा दिवस रशियामध्ये विजयदिन म्हणून साजरा केला जातो. दुस-या महायुद्धात याच दिवशी सोव्हियत युनियनने हिटलरच्या नाझी फौजांवर विजय मिळवला होता.