भायखळा येथील रेल्वेच्या जागेवर पहिले हेलिपॅड
By Admin | Updated: October 17, 2014 02:50 IST2014-10-17T02:50:57+5:302014-10-17T02:50:57+5:30
रेल्वे अपघातात जखमी प्रवाशाला थेट हॅलिकॉप्टरने रुग्णालयात नेता यावे यासाठी रेल्वेच्या जागेत हेलिपॅड उभारणीसाठी रेल्वेकडून 14 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

भायखळा येथील रेल्वेच्या जागेवर पहिले हेलिपॅड
>मुंबई : रेल्वे अपघातात जखमी प्रवाशाला थेट हॅलिकॉप्टरने रुग्णालयात नेता यावे यासाठी रेल्वेच्या जागेत हेलिपॅड उभारणीसाठी रेल्वेकडून 14 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यातील भायखळा येथील जागेची पाहणी हवाई दलाकडून करण्यात आली असून, त्याचा अहवालही हवाई दलाच्या मुख्य विभागाला सादर केला जाणार आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रेल्वेने कुठला तोडगा काढला, याची विचारणा उच्च न्यायालयाने नुकतीच केली होती.