मुंबई : गोरगाव येथील पत्राचाळ प्रकल्पातील ६७२ नव्या घरांची लॉटरी २३ मार्चला काढण्याचा घाट ‘म्हाडा’ने घातला असला तरी दुसरीकडे मात्र जोपर्यंत या प्रकल्पाला पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळत नाही, तोवर घरांची लॉटरी काढू नये, या मागणीवर गोरगाव सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्था ठाम आहे.
संस्थेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला तसेच अन्य काही ठराव करण्यात आले. म्हाडा संपूर्ण भोगवटा प्रमाणपत्र देत नाही, तोपर्यंत लॉटरी काढू नये तसेच तोपर्यंत सभासद सदनिकेचा ताबा घेणार नाहीत, असा ठाम पवित्रा सभासदांनी सभेत घेतला. कार्यकारिणी समितीचा लॉटरीचा अजेंड सभासदांनी धुडकावून लावला. तसेच ‘म्हाडा’कडून २५ कोटी कॉर्पस फंडवर नऊ टक्के व्याज घेणे, आदी ठराव मंजूर करून ‘म्हाडा’ला सादर करण्याचे ठरले.
म्हाडा केवळ विकासकम्हाडा लॉटरी काढू शकत नाही. किंवा म्हाडाने लॉटरी काढू नये, कारण हे अधिकार संस्थेचे आहेत. म्हाडा विकासक आहे. ‘म्हाडा’ने विकासकाचे दायित्व पूर्ण करायचे आहे. इमारत बांधून ती रहिवाशांना द्यायची आहे. सभासदत्व ठरविणे आणि लॉटरी काढणे ही कामे संस्थेची आहेत. ॲग्रीमेंटमध्ये तसा उल्लेख आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
...तोपर्यंत सोडत नकोम्हाडा प्राधिकरण ओसी देते, कारण म्हाडा नियोजन प्राधिकरण आहे. जोपर्यंत सर्व कामे पूर्ण होत नाहीत आणि सर्व शासकीय देणे दिली जात नाहीत व ‘ओसी’ मिळत नाही, तोपर्यंत लॉटरी काढून नये, असा निर्णय रहिवाशांनी एकमताने घेतला आहे.
‘ते’ अधिकार संस्थेचेशासन निर्णय ९ जुलै २०२१ प्रमाणे ६७२ सदनिकांचा ताबा संस्थेला देणे हे म्हाडाचे दायित्व आहे. तसेच त्रिपक्षीय कराराच्या खंड १.१.१२ व खंड २.१.१२ प्रमाणे ६७२ सभासदत्व प्रमाणित करणे व सदनिकांचे वाटप करणे हे संस्थेचे अधिकार आहेत.