पहिल्या दिवशी सिद्धिविनायकाचे दर्शन पहाटे सव्वातीनपासून

By Admin | Updated: December 30, 2014 00:50 IST2014-12-30T00:50:11+5:302014-12-30T00:50:11+5:30

नववर्षाची सुरुवात ही ‘श्रीं’च्या दर्शनाने भक्तांना करता यावी, यासाठी श्रीसिद्धिविनायक मंदिर भक्तांसाठी पहाटे ३.१५ला खुले होणार आहे.

On the first day, Siddhivinayak Darshan starts from the morning of Savvatin | पहिल्या दिवशी सिद्धिविनायकाचे दर्शन पहाटे सव्वातीनपासून

पहिल्या दिवशी सिद्धिविनायकाचे दर्शन पहाटे सव्वातीनपासून

मुंबई : नववर्षाची सुरुवात ही ‘श्रीं’च्या दर्शनाने भक्तांना करता यावी, यासाठी श्रीसिद्धिविनायक मंदिर भक्तांसाठी पहाटे ३.१५ला खुले होणार आहे.
पहाटे ३.१५ ते ५.१५ या वेळेत भक्तांना सिद्धिविनायकाचे दर्शन घेता येणार असून, पहाटे ५.३० ते ६.०० या वेळेत ‘श्रीं’ची आरती आणि पूजा करण्यात येणार आहे. यानंतर ६.१५ वाजता पुन्हा भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले होणार आहे. सायंकाळी ७.१५ वाजता काही काळासाठी दर्शन बंद करण्यात येणार आहे. सायंकाळी ७.३० ते ८.००च्या दरम्यान आरती करण्यात येणार असून, यानंतर ८ वाजता पुन्हा दर्शनाला सुरुवात होणार आहे. रात्री १० वाजेपर्यंत भक्तांना दर्शन घेता येईल. शेजारतीनंतर मंदिर बंद करण्यात येणार असल्याचे श्रीसिद्धिविनायक गणपती न्यासातर्फे कळवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: On the first day, Siddhivinayak Darshan starts from the morning of Savvatin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.