बाल गोविंदाचा मुंबईत नोंदला पहिला गुन्हा
By Admin | Updated: August 19, 2014 02:31 IST2014-08-19T02:31:05+5:302014-08-19T02:31:05+5:30
राम गणोश गोविंदा पथकाचा आयोजक चेतन खेतले (वय 18, रा. गांधीनगर वसाहत, मेघवाडी) याला मेघवाडी पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.

बाल गोविंदाचा मुंबईत नोंदला पहिला गुन्हा
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लघंन करून दहीहंडीमध्ये 10 वर्षाच्या मुलाला सहभागी केल्याप्रकरणी जोगेश्वरीतील ओम साई राम गणोश गोविंदा पथकाचा आयोजक चेतन खेतले (वय 18, रा. गांधीनगर वसाहत, मेघवाडी) याला मेघवाडी पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. जोगेश्वरी पूर्व येथील महाराज भवन मंडळाची दहीहंडी फोडण्यासाठी मंडळाने सुमित पारसनाथ खारवार या 1क् वर्षाच्या मुलाला मानवी थरावर चढविले होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
बारा वर्षाखालील मुलांना दहीहंडीमध्ये सहभागी केल्याप्रकरणी दाखल झालेल्या हा राज्यातील पहिला गुन्हा आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील संघर्ष प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये लहान मुले सहभागी होती. त्यामुळे त्यातील आयोजकावर ठाणो पोलीस कारवाई करणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. चेतन खेतले हा गोविंदा पथकाचा प्रमुख असून दुपारी त्याने दहीहंडी फोडण्यासाठी सुमितला सहभागी करुन घेतले होते. (प्रतिनिधी)