फर्स्ट क्लासच्या पासचे दर महागणार

By Admin | Updated: November 14, 2015 03:29 IST2015-11-14T03:29:05+5:302015-11-14T03:29:05+5:30

‘स्वच्छ भारत उपकर’ नावाने नवीन कर लागू करण्याचा निर्णय अलीकडेच केंद्र सरकारने घेतला. हा उपकर उपनगरीय रेल्वे पास आणि मेल-एक्सप्रेसच्या तिकिटांवरही लागू केला जाणार आहे

First Class Pass rates will be expensive | फर्स्ट क्लासच्या पासचे दर महागणार

फर्स्ट क्लासच्या पासचे दर महागणार

मुंबई : ‘स्वच्छ भारत उपकर’ नावाने नवीन कर लागू करण्याचा निर्णय अलीकडेच केंद्र सरकारने घेतला. हा उपकर उपनगरीय रेल्वे पास आणि मेल-एक्सप्रेसच्या तिकिटांवरही लागू केला जाणार आहे. त्यामुळे मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या एसी तसेच फर्स्ट क्लास तिकिटांच्या किमतीत वाढ होणार आहे. फर्स्ट क्लासच्या पासमध्ये किमान पाच रुपये वाढ होणार असून, त्याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून केली जाणार आहे, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अलोक बडकुल यांनी सांगितले.
फर्स्ट क्लास पासाचे दर कसे असतील (अंदाजित)
अंतर मासिक पास (रुपयांत) त्रैमासिक पास
सध्याचे दरनवीन दरसध्याचे दरनवीन दर
सीएसटी-ठाणे७४५७५0२0२५२0३५
सीएसटी-डोंबिवली९७५९८0२,६५५२,६७0
सीएसी-कल्याण१0९0१0९५२,९७0२,९८५
सीएसटी-बदलापूर१,२६0१,२७0३,४३५३,४५५
सीएसी-कर्जत१,६७0१,६८0४,५४0४,५६५
सीएसटी-कसारा१,९७0१,९८0५,३६0५,३९0
सीएसटी-बेलापूर९४५९५0२,६१0२,६२५
सीएसटी-पनवेल१,१५0१,१५५३,१७0३,१८५
चर्चगेट-बोरीवली७४५७५0२,0२५२,0३५
चर्चगेट-विरार१,१७0१,१७५३,१८0३,१९५

Web Title: First Class Pass rates will be expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.