Join us  

बारामतीत सुळेंविरुद्ध पहिला उमेदवार; OBC बहुजन पार्टीकडून ९ जणांची १ ली यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 7:54 PM

ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी पक्षाच्यावतीने ९ उमेदवारांची घोषणा करण्याता आल्याची माहिती दिली.

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर होत असून अद्यापही महाविकास आघाडी व महायुतीमध्ये काही जागांवरुन रस्सीखेच सुरू आहे. सांगलीतून शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसने नाराजी दर्शवली असून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र दिसून आलं. त्यातच, बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर झाली असून महायुतीचा उमेदवार कोण, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यातच, आता ओबीसी बहुजन पार्टीकडून ९ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, बारामती लोकसभा मतदारसंघाचेही नाव आहे.  

ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी पक्षाच्यावतीने ९ उमेदवारांची घोषणा करण्याता आल्याची माहिती दिली. यावेळी, बारामती लोकसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवार मैदानात उतरवला आहे. महेश भागवत यांना ओबीसी बहुजन पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली असून सुप्रिया सुळेंविरुद्ध पहिल्या उमेदवाराचे नाव जाहीर झाले आहे. दरम्यान, ओबीसी बहुजन पार्टीकडून कोल्हापूरात शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर, अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबडेकरांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. तर, सांगलीतून प्रकाश शेंडगे मैदानात उतरल्यास वंचितकडून त्यांना पाठिंबा मिळू शकतो. 

ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार जाहीर केल्यानंतर प्रकाश शेंडगे म्हणाले की, आज आमच्या सुकाणू समितीची बैठक झाली.  आज बैठकीत आम्ही 9 उमेदवार फिक्स केले आहेत. प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरु आहे. त्यात त्यांनी सांगलीतील जागेवर आम्हाला समर्थन केलेलं आहे. मी स्वत: जर निवडणूक लढवली तर प्रकाश आंबेडकर सांगलीतील जागेवर पाठिंबा देणार आहेत. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत, तिथे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही कोल्हापूर आणि हातकणंगले संदर्भात भूमिका घेतली आहे. ज्यात कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराजांना आम्ही पाठिंबा देतोय, असे त्यांनी सांगितले. 

मराठवाड्यातून नांदेड लोकसभा मतदारसंघात ॲड. अविनाश भोशीकर यांना उमेदवारी देत आहोत, ७० टक्के इथे ओबीसी मतदान आहे. परभणीतून हरीभाऊ शेळके यांना उमेदवार देत आहोत, जे धनगर नेते आहेत, ते लोकसभा लढवणार आहेत, अशी माहितीही शेंडगे यांनी दिली. दरम्यान, सोमवारी आम्ही हातकणंगले संदर्भात उमेदवारीचा निर्णय जाहीर करु, असंही प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केलं. 

उमेदवारांची यादी

हिंगोली - ॲड. रवी शिंदे 

यवतमाळ- वाशिम - प्रशांत बोडखे यांना उमेदवारी 

बारामती : महेश भागवत यांना आम्ही उमेदवारी 

बुलढाणा - नंदुभाऊ लवंगे यांना उमेदवारी धनगर समाजाचे नेते

शिर्डी : अशोक अल्लाड उमेदवारी, मातंग समाजाचे नेते 

हातकणंगले - मनिषा डांगे आणि प्रा. संतोष कोळेकर यांच्यापैकी एकाला आम्ही उमेदवारी देऊ… 

टॅग्स :सुप्रिया सुळेअन्य मागासवर्गीय जातीनिवडणूकलोकसभा निवडणूक २०२४बारामती