Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे उपविभागप्रमुख शेखर जाधव यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 09:30 IST

शिवसेनेचे उपविभागप्रमुख शेखर जाधव यांच्यावर विक्रोळी परिसरात अज्ञातांनी गोळीबार केला.

मुंबईः शिवसेनेचे उपविभागप्रमुख शेखर जाधव यांच्यावर विक्रोळी परिसरात अज्ञातांनी गोळीबार केला. गोळीबारात जखमी झालेल्या जाधवांना गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला असून, पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट असून, काही हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याचीही प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली. काही दिवसांपासून शेखर जाधव यांना काही धमक्या येत होत्या. गोळीबार झाला त्यावेळी शेखर जाधव यांचा मुलगासुद्धा त्यांच्यासोबत होता. तर यातील गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी सकाळी टागोर नगर येथील साईबाबा मंदिरात चंद्रशेखर हे त्यांच्या मुलांसोबत दर्शनास आले होते.या वेळी या इसमाने त्यांच्यावर तीन राउंड फायर केले ज्यात एक डाव्या खांद्यावर गोळी लागली असल्याचे समजते आहे.