Join us

भांडुपच्या केदारे चौकात क्षुल्लक कारणावरून गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 00:14 IST

भांडुपमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराचा प्रकार समोर आला आहे. अशोक केदारे चौकातील बंड्या रेडियम दुकानाच्या समोर ही घटना घडली आहे.

मुंबई- भांडुपमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराचा प्रकार समोर आला आहे. अशोक केदारे चौकातील बंड्या रेडियम दुकानाच्या समोर ही घटना घडली आहे. एक ग्रुप दारूच्या नशेत असताना त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यातूनच भोला गुप्ताने गाडीतून गावठी कट्टा आणत विजय यादव याच्या दिशेने एक गोळी झाडली. मात्र यात तो थोडक्यात बचावला . गोळीच्या आवाजाने स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत आरोपीच्या हातातून  गावठी कट्टा खाली पाडला. भांडुप पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. पैशाच्या वादातून ही घटना घडली आहे. दोघेही चालक आहेत. त्याच्याकडील गावठी कट्ट्यामध्ये एकूण ३ जिवंत काडतुसे होती. पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.