फटाक्यांमुळे आगीच्या घटना वाढल्या
By Admin | Updated: October 25, 2014 23:52 IST2014-10-25T23:52:32+5:302014-10-25T23:52:32+5:30
दिवाळीमुळे तिन दिवसात शहरात तब्बल 11 ठिकाणी आग लागली आहे. तुर्भे जनता मार्केटमध्ये पाच दुकाने जळून गेली असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

फटाक्यांमुळे आगीच्या घटना वाढल्या
नवी मुंबई : दिवाळीमुळे तिन दिवसात शहरात तब्बल 11 ठिकाणी आग लागली आहे. तुर्भे जनता मार्केटमध्ये पाच दुकाने जळून गेली असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दिवाळीचे फटाके व पणत्यांमुळे सर्व घटना घडल्या असून, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलासही धावपळ करावी लागली.
तुर्भेमधील जनता मार्केटमधील एक दुकानास गुरुवारी रात्री 1 वाजता अचानक आग लागली. मार्केटमधील सर्व दुकाने एकमेकांना लागून असल्यामुळे व दुकानांच्या बाहेर बांबू, प्लाटिक व इतर साहित्य असल्यामुळे येथील फरसाण, हार्डवेअर व इतर पाच दुकानांर्पयत आग पसरली. नागरिकांनी अग्निशमन विभागास कळविताच मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणो यांनी तात्काळ वाशी, नेरूळ, ऐरोली. सिबीडी अग्निशमन दलाच्या सहा गाडय़ा घटनास्थळावर बोलावल्या. एक तासात सर्व आग नियंत्रणात आणली गेली. आगीमध्ये दुकानांमधील सर्व साहित्य जळून गेले आहे.
अगिAशमन दलाने आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ जादा फायर इंजीन बोलावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा पुर्ण जनता मार्केट आगीच्या भक्षस्थानी पडले असते. मार्केटमध्ये मोठय़ाप्रमाणात अतिक्रमण झाले असल्यामुळे अग्निमशमन अधिका:यांना आग विझविण्यातही तारेवरची कसरत करावी लागत होते. दुकानांबाहेर लावण्यात आलेल्या पणत्यांमुळे आग लागल्याचे बोलले जात असून काही जण फटाक्यामुळे ही घटना घडल्याचे सांगत आहेत. आगिचे नक्की कारण स्पष्ट झालेले नाही. आगिमुळे परिसरात मध्यरात्री नागरिकांनी गर्दी केली होती. या घटनेमुळे एक दुकानदारास हृदयविकाराच झटका आल्याचे बोलले जात असून सदर व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. वाशी, कोपरखैरणो, तुर्भे व नेरूळमध्ये तीन दिवसामध्ये तब्बल 11 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
च्नवी मुंबईच्या वाशी अग्निशमन दलामधील कर्मचारी या आगिविषयी माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते.
च्येथे कार्यरत असलेल्या आर. एन. वारगडे या अग्निशमन कर्मचा:याने सांगितले, आम्हाला माहिती देण्यास वरिष्ठांनी मनाई केली आहे.
च्आम्ही या आगीची माहिती देणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु वरिष्ठ अधिका:यांनी मात्र अशाप्रकारे माहिती देण्यास मनाई केली नसल्याचे स्पष्ट केले.
कोपरखैरणोत शेडला आग
कोपरखैरणो सेक्टर 19 मधील गणपती कारखाण्याच्या शेडला फटाक्यामुळे आग लागली. या आगीमध्ये शेड जळाले असून काही मुर्तीचेही नुकसान झाले आहे. या परिसरातील कार्यकर्ते गोपीनाथ आगासकर व इतरांनी सदर आग नियंत्रणात आणली.
सजावटीचे साहित्य जळाले
वाशी सेक्टर 9 मधील महापालिकेच्या बहुउद्देशीय इमारतीच्या आवारात मंडप सजावटीचे साहित्य ठेवण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी फटाक्यामुळे या साहित्याला आग लागली आहे. या आगिमध्ये साहित्य जळून गेले असून वाशी अगिAशमन दलाच्या कर्मचा:यांनी घटनास्थळी जावून आग नियंत्रणात आणली.