Join us  

वरळीतील दूरदर्शन केंद्रातील एफएम रेडिओच्या ट्रान्समिशन सेंटरला आग 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 8:36 PM

सकाळी 8.16 मिनिटांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देआग लागल्यामुळे एफएम रेडिओचे प्रसारण बंद करण्यात आले होते. मुंबईत सलग चार दिवसांपासून आगीच्या घटना सुरूच आहेतशॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे

मुंबई - अंधेरीतील कामगार रुग्णालयाला आग लागल्यानंतर मुंबईत आगीचे सत्र सुरूच आहे. काल रात्री चक्क दोन ठिकाणी आग लागली होती. त्यानंतर आज सकाळी वरळी येथील दूरदर्शन केंद्रात आग लागली होती. दूरदर्शन केंद्रामधील एफएम रेडिओच्या ट्रांसमिशन सेंटरला आग लागली होती. आग लागल्यामुळे एफएम रेडिओचे प्रसारण बंद करण्यात आले होते. सकाळी 8.16 मिनिटांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईत सलग चार दिवसांपासून आगीच्या घटना सुरूच आहेत. सोमवारी अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीनंतर, बुधवारी दुपारी माटुंगा लेबर कॅम्पमध्ये आग लागून 3 घरांचे नुकसान झाले होते. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील कचऱ्याला देखील आग लागली तर रात्री 11 च्या सुमारास नरिमन पॉइंट येथील ट्रायडेन्ट हॉटेलला आग लागली होती. त्यानंतर काही वेळातच माझगाव येथील अफजल हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली होती.

टॅग्स :आगअंधेरी कामगार रुग्णालयाला आग