कॉटनग्रीन स्थानकाजवळील स्कायवॉकला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:23 IST2019-09-15T06:23:03+5:302019-09-15T06:23:06+5:30

हार्बर मार्गावरील कॉटनग्रीन स्थानकाजवळील स्कायवॉकला शनिवारी पहाटे ७.१५च्या सुमारास आग लागली.

Fire at Skywalk near Cottongreen Station | कॉटनग्रीन स्थानकाजवळील स्कायवॉकला आग

कॉटनग्रीन स्थानकाजवळील स्कायवॉकला आग

मुंबई : हार्बर मार्गावरील कॉटनग्रीन स्थानकाजवळील स्कायवॉकला शनिवारी पहाटे ७.१५च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.
आगीमुळे स्कायवॉकवरील छप्पर जळून खाक झाले. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ उभ्या असलेल्या जयपूर सुपर फास्ट एक्स्प्रेसच्या
एका डब्यालाही आग लागली
होती.

Web Title: Fire at Skywalk near Cottongreen Station