Join us  

अंधेरी पश्चिममधील पेनिन्सुला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 1:56 PM

अंधेरी पश्चिममधील पेनिन्सुला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली असून अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. 

मुंबई : अंधेरी पश्चिममधील पेनिन्सुला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली असून अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. 

पेनिन्सुला ही 22 मजल्यांची व्यवसायिक इमारत असल्याने यामध्ये अनेक कर्मचारी काम करत असतात. आग लागल्याने काहीजण आतमध्ये अकडले असल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि बचाव पथकाकडून मदतीचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाने आतापर्यत 3 जणांची सुखरुप सुटका केली आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर अचानक लागलेल्या आगीचे कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे.

टॅग्स :आगअंधेरी