वरळीतील शुभदा बिल्डिंगमध्ये आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 05:24 IST2018-10-21T05:24:45+5:302018-10-21T05:24:47+5:30
अनेक मोठे राजकारणी आणि प्रतिष्ठित व्यक्तींचे वास्तव्य असलेल्या शुभदा इमारतीच्या अ विंगच्या १० व्या मजल्यावर शनिवारी

वरळीतील शुभदा बिल्डिंगमध्ये आग
मुंबई : अनेक मोठे राजकारणी आणि प्रतिष्ठित व्यक्तींचे वास्तव्य असलेल्या शुभदा इमारतीच्या अ विंगच्या १० व्या मजल्यावर शनिवारी रात्री १० वाजून १२ मिनिटांनी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. थोड्याच वेळात १० व्या मजल्यावरील ही आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीसंदर्भात तपास सुरू आहे.