मुंबई – मुंबईतील बॅलार्ड पियर भागात गोवा स्ट्रीटवरील संत निवास या इमारतीतील शॉप क्रमांक ३ ला आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे ३ फायर इंजिन आणि १ पाण्याचा टँकर पोहचला असून आग आटोक्यात आली आहे. शेर-ए-पंजाबच्या बाजूला असलेल्या या चार माळ्याच्या इमारतीच्या तळमजल्याला असलेल्या दुकानाला आग लागल्याची माहिती फोर्ट फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी दिली. सध्या आग विजली असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.
बॅलार्ड पियर येथे इमारतीतील दुकानाला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 13:33 IST