महाडमध्ये आॅटो सर्व्हिस सेंटरला आग

By Admin | Updated: March 4, 2015 22:24 IST2015-03-04T22:24:26+5:302015-03-04T22:24:26+5:30

महाड शहरानजीक महामार्गावर श्री आॅटो सेंटर या मारुती कंपनीच्या अधिकृत सर्व्हिसिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीमध्ये संपूर्ण मशिनरीजसह स्पेअर पार्ट आदी यंत्रसामग्री जळून खाक झाली.

A fire service to the Auto Service Center in Mahad | महाडमध्ये आॅटो सर्व्हिस सेंटरला आग

महाडमध्ये आॅटो सर्व्हिस सेंटरला आग

महाड : महाड शहरानजीक महामार्गावर श्री आॅटो सेंटर या मारुती कंपनीच्या अधिकृत सर्व्हिसिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीमध्ये संपूर्ण मशिनरीजसह स्पेअर पार्ट आदी यंत्रसामग्री जळून खाक झाली. काल सायंकाळी लागलेल्या या आगीत सुमारे ६० लाख रुपयांची हानी झाल्याचे वृत्त आहे. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. महाड एमआयडीसी व महाड नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर तीन तासांनंतर ही आग आटोक्यात आली.
नितीन पाटील, भाई पाटील यांच्या मालकीच्या नडगाव हद्दीत हे सर्व्हिस सेंटर असून सायंकाळी ६.३० च्या सुमारास पाटील हे सर्व्हिस सेंटर बंद करून घरी गेले. त्यानंतर एका तासाच्या काळात ही अचानक आग लागल्याने त्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन घटनास्थळी पोहचले मात्र सेंटरमधील आॅइलचा साठा, फायबर अ‍ॅक्सेसरीज आदिंमुळे ही आग काही काळातच भडकली. या आगीत सेंटरमधील अलायमेंट मशिनसह अनेक अद्ययावत मशिनरी जळून खाक झाली तर कार्यालयाच्या माळ्यावर असलेले स्पेअरपार्ट्स, संगणके आदि सामानदेखील जळून बेचिराख झाले.
घटनेचे वृत्त समजताच डीवायएसपी शिवाजीराव देशमुख, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार सरले आदि शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. (वार्ताहर)

 

Web Title: A fire service to the Auto Service Center in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.