कोकण भवनला अग्निसुरक्षा
By Admin | Updated: December 11, 2014 01:10 IST2014-12-11T01:10:38+5:302014-12-11T01:10:38+5:30
मंत्रलयाला आग लागल्यानंतर तब्बल अडीच वर्षानी शासनाला जाग आली आहे. मिनी मंत्रलय म्हणून ओळख असणा:या कोकण भवनमध्ये आग सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

कोकण भवनला अग्निसुरक्षा
नामदेव मोरे ल्ल नवी मुंबई
मंत्रलयाला आग लागल्यानंतर तब्बल अडीच वर्षानी शासनाला जाग आली आहे. मिनी मंत्रलय म्हणून ओळख असणा:या कोकण भवनमध्ये आग सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी 53 लाख 83 हजार 84क् रुपयांची तरतूद केली आहे.
सीबीडीमध्ये असलेल्या कोकण भवन कार्यालयाच्या इमारतीमधून कोकण महसूल विभागाचे कामकाज सुरू आहे. या व्यतिरिक्त नवी मुंबई वाहतूक पोलीस उपआयुक्त, सहायक आयुक्त, कोकण परिक्षेत्र पोलीस महासंचालक कार्यालय, राज्य गुप्तचर विभाग, विभागीय ग्रंथालय, जातपडताळणी, पोस्ट ऑफिस, ग्राहक मंच, विभागीय माहिती आयुक्तालय याप्रमाणो 5क् पेक्षा जास्त महत्त्वाची कार्यालये आहेत. मुंबई, ठाणो ते सिंधुदुर्ग, रत्नागिरीर्पयतचे हजारो नागरिक व कर्मचारी या ठिकाणी कामानिमित्त येत असतात. या सर्वाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनाच नाहीत. मुंबईत मंत्रलयास 21 जून 2क्12 ला आग लागली होती. या दुर्घटनेनंतर शासनाने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये आग सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु कोकण भवनमध्ये मात्र आग सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली नव्हती.
आग नियंत्रक उपकरणो कार्यान्वित नसल्याने या ठिकाणी काम करणा:यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. चुकून या ठिकाणी आग लागली तर मोठय़ाप्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंत्रलयातील आगीच्या घटनेला अडीच वर्षे झाल्यानंतर शासनाने कोकण भवनमध्ये अग्नि सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी येणा:या 1 कोटी 53 लाख 83 हजार 84क् रुपयांच्या अंदाजपत्रकास व नकाशास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याविषयी शासन अध्यादेश 9 डिसेंबरला काढण्यात आला आहे. याविषयी उचित कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
या कामाची अंदाजपत्रके उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग ठाणो यांच्याकडून साक्षांकित करण्यात आली आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा हा विषय मार्गी लागणार असून कार्यालयाला अग्नीकवच मिळेल.
कोकण भवनमध्ये प्रत्येक मजल्यावर काही ठिकाणी आग विझविण्यासाठी अग्निरोधक उपकरण ठेवण्यात आला आहे. इमारतीमध्ये आग नियंत्रणासाठीची यंत्रणा बसविण्यात आली होती. परंतु ती कार्यान्वित नाही. इमारतीमध्ये दाटीवाटीने कार्यालये थाटण्यात आली आहेत. तळ व पहिल्या मजल्यावर कँटीन आहे. या ठिकाणी आग लागल्यास मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
अग्नि सुरक्षेची उपाययोजना करण्यासाठी येणा:या 1 कोटी 53 लाख 83 हजार 84क् रुपयांच्या अंदाजपत्रकास व नकाशास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याविषयी शासन अध्यादेश 9 डिसेंबरला काढण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच याला गती मिळेल.
च्महामार्ग व सीबीडी रेल्वे स्टेशनजवळ कोकण भवनची वास्तू आहे. महसूल कार्यालयासह जवळपास 5क् पेक्षा जास्त विविध कार्यालये आहेत.
च्शहरात सर्वाधिक गर्दी व वर्दळ या ठिकाणी असते. मिनी मंत्रलय म्हणून ओळख असल्यामुळे कोकण भवनला विशेष महत्त्व आहे.
च्परंतु येथे सुरक्षा व्यवस्था अपुरी आहे. येथे येणा:या - जाणा:यांवर कोणाचेही नियंत्रण नाही.