Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलबार हिल येथील रहिवासी इमारतीला आग; आठ जणांची सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 21:19 IST

लिटील गिब्स रोडवरील तळमजला अधिक १४ माळ्याच्या लास्ट प्लाम या रहिवासी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर बुधवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.

मुंबई : मलबार हिल येथील लिटील गिब्स रोडवरील तळमजला अधिक १४ माळ्याच्या लास्ट प्लाम या रहिवासी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर बुधवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या वतीने घटनास्थळी आठ फायर इंजिन, सात जम्बो टँकर्ससह चार रुग्णवाहिका तातडीने धाडण्यात आल्या. आग शमविण्याचे काम सुरू असतानाच विशेष उपकरणांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून आठ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. या आठ जणांमध्ये तीन महिला, पाच पुरुषांचा समावेश आहे.