Join us

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 15:17 IST

सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई: शहरातील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग लागल्याची घटना घडली. भीषण स्वरुपाची आग लागल्यानं अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. क्रॉफर्ड मार्केटमध्ये लागलेली आग लेव्हल-२ची होती. सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग लागल्याची माहिती सकाळी सव्वा सहाच्या सुमारास अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर तातडीनं अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. क्रॉफर्ड मार्केटमध्ये घरगुती वस्तूंची अनेक दुकानं आहेत. याशिवाय या भागात फळं, भाज्या आणि किराणा मालाचीदेखील दुकानं आहेत.