Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालाड स्टेशन परिसरात आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 19:57 IST

मालाड स्टेशन परिसरात रविवारी संध्याकाळी एका दुकानात अचानक आग लागली. हे दुकान एका रुग्णालयाशेजारी आहे. त्यामुळे याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु केला.

मुंबई : मालाड स्टेशन परिसरात रविवारी संध्याकाळी एका दुकानात अचानक आग लागली. हे दुकान एका रुग्णालयाशेजारी आहे. त्यामुळे याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु केला.मालाड पुर्वच्या मंनशूभाई रोड परिसरात संध्याकाळी सातच्या सुमारास ही आग लागली. याठिकाणी असलेल्या दुकानाच्या रांगातील एका फरसाणच्या दुकानाने पेट घेतला. संध्याकाळची वेळ त्यामुळे कार्यलयातुन घराच्या दिशेने निघालेले स्थानीक, शेअरींग रिक्षा आणि त्यातच रक्षाबंधनच्या खरेदीसाठी लोकांची प्रचंड गर्दी या परिसरात होती. ही आग लागली त्याच्या शेजारीच सूचक नावाचे एक रुग्णालय आहे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी अमीत शिंदे यांनी 'लोकमत' ला दिली. त्यामुळे अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली. यात कोणत्याही प्रकारची वित्तहानी झालेली नसुन शॉर्टसर्किट मुळे ही लागल्याचा प्राथमीक अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात येत आहे.