गोरेगावच्या कपडा मार्केटमध्ये आग; दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:05 IST2021-03-31T04:05:57+5:302021-03-31T04:05:57+5:30

सात गाळ्यांचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोरेगावच्या कपडा मार्केट परिसरात मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. यात मोठ्या ...

Fire at Goregaon textile market; Two injured | गोरेगावच्या कपडा मार्केटमध्ये आग; दोन जखमी

गोरेगावच्या कपडा मार्केटमध्ये आग; दोन जखमी

सात गाळ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोरेगावच्या कपडा मार्केट परिसरात मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. सात गाळ्यांचे नुकसान झाले असून दोन जण किरकोळ जखमी झाले.

गोरेगाव पश्चिमच्या टोपीवाला शाळा परिसरातील गुजरात साडी सेंटरजवळ हे कपडा मार्केट आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास येथे अचानक आग लागली. याची माहिती अग्निशमन दलाला साडेनऊ वाजता मिळाली. त्यानुसार चार फायर इंजिनसह ते घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. शर्थीचे प्रयत्न करुन साडेबाराच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

सात गाळ्यांमधील मोठ्या प्रमाणात असलेल्या साड्या तसेच कपडे व इतर सामान आगीमुळे जळून खाक झाले. तर अनिल कुमार आणि अमृत गायकवाड असे दाेघे किरकोळ जखमी झाले. अनिल यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अमृत यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले.

Web Title: Fire at Goregaon textile market; Two injured