वर्सोवा बीचवर बुडणा-या कुटुंबाला अग्निशमन दलाने वाचवले

By Admin | Updated: June 26, 2016 20:09 IST2016-06-26T20:09:26+5:302016-06-26T20:09:26+5:30

वर्सोवा बीचमध्ये बुडत असलेल्या एका कुटुंबातील तिघांना अग्निशमन दलाच्या जवानांमुळे जीवनदान मिळाले.

The fire fighting team survived the Versova beach | वर्सोवा बीचवर बुडणा-या कुटुंबाला अग्निशमन दलाने वाचवले

वर्सोवा बीचवर बुडणा-या कुटुंबाला अग्निशमन दलाने वाचवले

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ -  वर्सोवा बीचमध्ये बुडत असलेल्या एका कुटुंबातील तिघांना अग्निशमन दलाच्या जवानांमुळे जीवनदान मिळाले. अग्निशमन दलाच्या सतर्केमुळे ११ वर्षीय मुलासह त्याच्या आई - वडीलांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. 
 
शरयू आर्या (४३), मनीष आर्या (४३) आणि निरमित आर्या (११) अशी यामध्ये बुडत असलेल्या तिघांची नावे आहेत. वर्सोवा परिसरात आर्या कुटुंबीय राहतात. रविवारी सुट्टी असल्याने इतरांप्रमाणे आर्या कुटुंबीय पावसाची मजा लुटण्यासाठी वर्सोवा बीचकडे आले होते. 
 
अशातच आतमधील खडकात उभे असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने ते पाण्यात बुडू लागले. घटनेची माहिती फायर रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत त्यांना वाचविले. तिघांनाही सुखरुप बाहेर काढण्यात या टिमला यश आले. तिघांनाही कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 

Web Title: The fire fighting team survived the Versova beach