फायर ड्रोन आणि फायर रोबोट येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:34 IST2021-02-05T04:34:01+5:302021-02-05T04:34:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महापालिकेकडून मुंबई अग्निशमन दलासाठी महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून, यात ठाकूर व्हिलेज ...

Fire drones and fire robots will come | फायर ड्रोन आणि फायर रोबोट येणार

फायर ड्रोन आणि फायर रोबोट येणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महापालिकेकडून मुंबई अग्निशमन दलासाठी महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून, यात ठाकूर व्हिलेज येथे ड्रील टॉवर कम मल्टी युटिलिटी टेनिंग सिम्युलेटर्सचे बांधकाम, फायर ड्रोनची खरेदी, इंटिग्रेटेड कमांड, कंट्रोल प्रणालीकरिता डिझास्टर रिकव्हरी साईटसची उभारणी, मिनी फायर स्टेशनकरिता जलद प्रतिसाद वाहनांची खरेदी आणि फायर रोबोटसची खरेदीचा समावेश आहे.

मुंबईतल्या आगीवर नियंत्रण मिळविता यावे यासाठी जनजागृती कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवक प्रशिक्षणाचा कार्यक्रम नियमितपणे आयोजित केला जातो. परिणामी आगीच्या घटना कमी होण्यास मदत झाली आहे. शिवाय व्यापार आणि व्यवसायाची तपासणी केली जाते. अग्नी सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. आस्थापना आणि व्यवसायांना परवानगी देताना अग्निशमन दलामार्फत परवानगी शुल्क आकारले जात नाही. एकूण अर्थसंकल्पात १९९.४७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Fire drones and fire robots will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.