पनवेलमध्ये कपड्याच्या दुकानाला आग
By Admin | Updated: May 17, 2015 00:36 IST2015-05-17T00:36:30+5:302015-05-17T00:36:30+5:30
नवीन पनवेल येथील एका कपड्याच्या दुकानात आज अचानकपणे लागलेल्या आगीत कपड्यांसह इतर साहित्य भस्मसात झाले आहे,

पनवेलमध्ये कपड्याच्या दुकानाला आग
पनवेल : नवीन पनवेल येथील एका कपड्याच्या दुकानात आज अचानकपणे लागलेल्या आगीत कपड्यांसह इतर साहित्य भस्मसात झाले आहे, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नवीन पनवेल सेक्टर ११ येथील फॅशन प्लस या एसी कपड्याच्या दुकानाला आज अचानकपणे आग लागली़ सदर दुकान पूर्णपणे वातानुकूलित असल्याने पोटमाळ्यावर असलेल्या एसीमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग लागल्याचे समजताच श्री अमरनाथ सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुनील आचोलकर व इतर व्यापाऱ्यांनी त्वरित त्या ठिकाणी
धाव घेतली.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब व पोलिसांना पाचारण करण्यात आले. वातानुकूलित दुकानामुळे पुढील बाजूची काच तोडून अग्निशामक दलाच्या जवानांनी तसेच सुनील आचोलकर यांनी आत प्रवेश केला व जास्तीत जास्त सामान बाहेर काढले.
आग आतून पसरू नये यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी पोटमाळ्याच्या भिंतीला भगदाड पाडून पाणी मारले़ आगीत दुकानातील कपड्यांसह इतर साहित्य भस्मसात झाले असून, मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समजते. (वार्ताहर)