सिडनहॅमच्या ग्रंथालयात आग

By Admin | Updated: December 26, 2016 04:45 IST2016-12-26T04:45:03+5:302016-12-26T04:45:03+5:30

चर्चगेट, बी. रोडवरील सिडनहॅम महाविद्यालयाला रविवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील

Fire in Cindham's Library | सिडनहॅमच्या ग्रंथालयात आग

सिडनहॅमच्या ग्रंथालयात आग

मुंबई : चर्चगेट, बी. रोडवरील सिडनहॅम महाविद्यालयाला रविवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील लायब्ररीमध्ये शॉटसर्किट झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता, अग्निशमन दलाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. महाविद्यालयात शेकडो वर्षांपासून असलेली जुनी पुस्तके, लायब्ररीमधील कोरीव व दुर्मीळ फर्निचर आणि अन्य ग्रंथसंपदा आगीत जळून खाक झाली. अग्निशमन दलाने ४ फायर इंजिन आणि ५ बंब घटनास्थळी पाठवत आग आटोक्यात आणली. आगीत जीवितहानी झाली नसली, तरी दुर्मीळ ग्रंथ आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली? याची चौकशी पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Fire in Cindham's Library