बिझनेस पार्क पॉइंटला आग

By Admin | Updated: March 26, 2015 01:58 IST2015-03-26T01:58:40+5:302015-03-26T01:58:40+5:30

अंधेरी, पश्चिम द्रुतगती मार्गावरील बिझनेस पार्क पॉईट या व्यावसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बुधवारी सकाळी अकराच्या अचानक आग लागली.

Fire at Business Park Point | बिझनेस पार्क पॉइंटला आग

बिझनेस पार्क पॉइंटला आग

मुंबई : अंधेरी, पश्चिम द्रुतगती मार्गावरील बिझनेस पार्क पॉईट या व्यावसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बुधवारी सकाळी अकराच्या अचानक आग लागली. या आगीत मजल्यावरील तीन खासगी कंपनीची कार्यालये जळून खाक झाली. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने लोकमतला दिली.
सकाळी अकराच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर आग लागली. इमारतीत धूर पसरल्याने आग लागल्याचे इमारतीत उपस्थित असलेल्या खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना समजले. त्यानुसार तत्काळ अग्निशमन दलाला आगीची वर्दी देण्यात आली. तेवढया वेळात आग पसरली. आगीने मेधा डी, एस्टोबेटो आणि फोर्चुन जेमिनी सोल्युशन प्रा. लि कंपनी या तीन कार्यालयांना आपल्या कवेत घेतले. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून शर्थीच्या प्रयत्नांनंतर दोन तासांनी आग आटोक्यात आणली व विझवली.
तिन्ही कार्यालयांमधील इलेक्ट्रिक केबल, एसी, एलइडी टीव्ही, झेरॉक्स मशिन, टेलिफोन, सिलिंग, खिडक्या, दरवाजे जळून खाक झाल्या. या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असली तरी कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न अग्निशमन दल करत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fire at Business Park Point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.