सीबीडी येथे इमारतीमध्ये आग
By Admin | Updated: February 14, 2015 01:36 IST2015-02-14T01:36:02+5:302015-02-14T01:36:02+5:30
सीबीडी येथील इमारतीमध्ये कार्यालयात शुक्रवारी दुपारी आगीची दुर्घटना घडली. या प्रकारात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

सीबीडी येथे इमारतीमध्ये आग
नवी मुंबई : सीबीडी येथील इमारतीमध्ये कार्यालयात शुक्रवारी दुपारी आगीची दुर्घटना घडली. या प्रकारात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
सेक्टर ११ येथील कासा ब्लांका इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागलेली. तेथील व्ही एक्सप्रेस या कार्यालयात शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली. १३ व्या मजल्यावरील कार्यालयात चार व्यक्ती आडकल्या होत्या. त्यानुसार अग्निशमन जवानांनी ब्रांटो लिफ्टच्या सहाय्याने त्यांची सुखरुप सुटका केली. त्यानुसार सुमारे दीड तासानंतर ही आग आटोक्यात आली. (प्रतिनिधी)