वाशीतील बीएसईएल इमारतीत आग
By Admin | Updated: May 28, 2014 01:04 IST2014-05-28T01:04:59+5:302014-05-28T01:04:59+5:30
वाशी येथील बीएसईएल टॉवरमध्ये आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या आगीत इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील दोन कार्यालये जळून खाक झाली असून जीवितहानी झालेली नाही.

वाशीतील बीएसईएल इमारतीत आग
नवी मुंबई : वाशी येथील बीएसईएल टॉवरमध्ये आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या आगीत इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील दोन कार्यालये जळून खाक झाली असून जीवितहानी झालेली नाही. शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. बीएसईएल इमारतीच्या बी विंगच्या सहाव्या मजल्यावर ६११ क्रमांकाच्या मॅग्नस या कार्यालयात प्रथम आग लागली होती. कार्यालयात मोठया प्रमाणात कागदपत्रे व लाकडी फर्निचर असल्याने ही आग अधिकच पसरली. त्यामध्ये शेजारी असलेल्या इतर तीन कार्यालयांमध्ये देखील आग पसरली. आगीची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु बर्याच प्रयत्नानंतरही आग आटोक्यात न आल्याने मुंबई, ठाणे, सिडको, कल्याण डोंबिवली येथील अग्निशमन बंब घटनास्थळी धावून आले. आगीमुळे इमारतीच्या सहाव्या व त्यावरील मजल्यांवर सुमारे ६० हून अधिक कर्मचारी अडकले होते. परंतु अग्निशमन अधिकार्यांनी या सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामध्ये एक गरोदर महिला व धुरात अडकलेल्या तरु णाचाही समावेश होता. आग विझवण्याकरिता इमारतीत जाण्यासाठी अग्निशमन अधिकारी कर्मचार्यांना बरीच कसरत करावी लागली. अखेर कार्यालयाच्या काचा फोडून आत पाण्याचा मारा करण्यात आला. त्याकरिता नवी मुंबई अग्निशमन दलाची ब्रँटो ही गाडी वापरण्यात आली. बचतकार्य दरम्यानच पाणी साठा संपल्याने शेजारच्या मैथिली इमारतीचा पाणीसाठा आग विझवण्यासाठी वापरण्यात आला. बीएसईएल इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. परंतु ती कार्यरत नसल्याचे यावेळी आढळून आल्याचे अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनी सांगितले. तर धुरामुळे कार्यालयात घुसून पाण्याचा मारा करण्यातही कर्मचार्यांना त्रास जाणवल्याचे ते म्हणाले. आगीच्या या घटनेमुळे १२ मजल्याची ही संपूर्ण इमारत मोकळी करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच महापौर सागर नाईक, उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली. (प्रतिनिधी)