Join us

मालाडमधील एम. एम. मिठाईवाला दुकानाला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 08:49 IST

अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल 

मुंबई: मालाड स्टेशनजवळील एम. एम. मिठाईवाला दुकानाला आग लागली आहे. सकाळी पावणे आठच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येतेय. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि 8 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. मालाड स्टेशनच्या अगदी जवळ हे दुकान आहे. स्टेशन परिसर आणि त्यातही ऑफिसला  पोहोचण्यासाठी लोकांची घाई असल्याने याठिकाणी गर्दी वाढत आहे. मालाड पोलीस गर्दीचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समजलं नसून शॉर्टसर्किटमुळे हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :आगमुंबई