धारावीत ९० फुटी रस्त्यानजीकच्या सातमजली इमारतीला आग, ३२ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2023 10:38 IST2023-06-12T10:38:23+5:302023-06-12T10:38:31+5:30
आगीत घरातील सामानसुमान जळून खाक

धारावीत ९० फुटी रस्त्यानजीकच्या सातमजली इमारतीला आग, ३२ जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : धारावी येथे ९० फुटी रस्त्यानजीकच्या शमा या सात मजली इमारतीत रविवारी सकाळी ११ वाजता लागलेल्या आगीमध्ये ३२ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नाने दीड तासांमध्ये आग विझवली. या आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. इमारतीच्या पाचव्या आणि सातव्या मजल्यावर भंगाराचे सामान ठेवले होते. त्याला आग लागल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते.
या आगीत घरातील सामानसुमान जळून खाक झाले. तस आगीमध्ये मुस्कान शेख (३५ वर्षे), रावण शेख (७ महिने), रुक्साना शेख (२६ वर्षे), फरहान शेख (१० वर्षे), नाडिया शेख (५ वर्षे) आणि सना दळवी (२७ वर्षे) यांच्यासह ३२ जण जखमी झाले. जखमींना सायन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.