Join us
Daily Top 2Weekly Top 5

जोगेश्वरी पंप हाऊस,आघाडी नगर येथील एका इमारतीच्या मीटर बॉक्सला लागली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 14:17 IST

घटनेची माहिती मिळताच उद्धव सेनेचे स्थानिक आमदार अनंत (बाळा) नर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामन दलाच्या सहा गाड्या व जवानांनी प्रसंगावधान राखत शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.

मुंबई-जोगेश्वरी (पूर्व) विधानसभेतील पंप हाऊस आघाडी नगर येथील एका इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आज दुपारी एकच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागण्याची गंभीर घटना घडली. या आगीत तीन घरे तसेच दोन चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच उद्धव सेनेचे स्थानिक आमदार अनंत (बाळा) नर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामन दलाच्या सहा गाड्या व जवानांनी प्रसंगावधान राखत शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.यावेळी आदानी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाचारण करून तांत्रिक तपासणी करण्याच्या व आवश्यक उपाययोजना त्वरित राबवण्याच्या सूचना दिल्या. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी मीटर बॉक्सची नियमित देखभाल, विद्युत लोड तपासणी तसेच सुरक्षात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

या प्रसंगी प्रभाग क्रमांक ७७च्या नगरसेविका शिवानी परब. प्रभाग क्रमांक ७९च्या नगरसेविका मानसी जुवाटकर, शाखाप्रमुख नंदकुमार ताम्हणकर, अनंत भुते, महिला शाखा संघटिका संजीवनी दणदणे, बाळा नाईक, आशिष कांदू तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.