Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुहू रेसिडेन्सी हॉटेलला आग

By जयंत होवाळ | Updated: December 18, 2023 19:34 IST

आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जुहूतील जुहू रेसिडेन्सी हॉटेलला सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. चार माजली हॉटेलच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

सांताक्रूझ जुहू तारा रोडवरील जे.डब्ल्यू . मॅरीएट हॉटेलसमोर जुहू रेसिडेन्सी हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचले. हॉटेलखाली रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात सांताक्रूझ मधील हॉटेल गॅलेक्सीला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला होता. तर दोन जण जखमी झाले होते. मरण पावलेले तिघे नैरोबीला जाणार होते. मात्र विमानास  विलंब असल्याने ते या हॉटेलमध्ये थांबले होते. या हॉटेलमध्ये अग्नीसुरक्षे यंत्रणा कार्यान्वित नव्हती. त्या प्रकरणी अग्निशमन दलाने हॉटेलला नोटीस बजावली होती.

टॅग्स :आग