खड्ड्यांवर शोधा जालीम उपाय
By Admin | Updated: November 6, 2016 04:03 IST2016-11-06T04:03:00+5:302016-11-06T04:03:00+5:30
सतत खड्ड्यात असलेल्या काही रस्त्यांपुढे मुंबई महापालिकेनेही हात टेकले आहेत. त्यामुळे अशा खड्ड्यांची यादीच तयार करून त्यावर रामबाण उपाय शोधण्याची

खड्ड्यांवर शोधा जालीम उपाय
मुंबई : सतत खड्ड्यात असलेल्या काही रस्त्यांपुढे मुंबई महापालिकेनेही हात टेकले आहेत. त्यामुळे अशा खड्ड्यांची यादीच तयार करून त्यावर रामबाण उपाय शोधण्याची ताकीद पालिका आयुक्त अजय मेहता यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबई खड्ड्यात जाते. मात्र या वर्षी पावसाळ्यानंतरही खड्डे कायम आहेत. मुसळधार पाऊस लांबल्यामुळे रस्त्यांची ही अवस्था असल्याचा बचाव पालिका प्रशासन करीत आहे. मात्र एकाच ठिकाणी सतत खड्डा पडत असल्याचे चित्र अनेक विभागांमध्ये असल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. मनसेने या प्रकरणी रस्त्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनाच खड्ड्यात उभे केल्यामुळे अभियंता व नगरसेवकांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. हमखास खड्ड्यात जाणाऱ्या रस्त्यांची यादी पालिका तयार करीत आहे. अशी ताकीदच आयुक्तांनी सर्व सहायक आयुक्तांना शनिवारच्या मासिक आढावा बैठकीत दिली आहे. (प्रतिनिधी)
खड्डे बुजविण्यासाठी १,६३३ मेट्रिक टन साहित्य
१ ते १० आॅक्टोबरदरम्यान पावसामुळे खड्डे भरता आले नाहीत. मात्र पाऊस थांबताच १,६३३ मेट्रिक टन सहित्य वापरून खड्डे भरण्यात आले. पाऊस जास्त असल्याने खड्डे वाढले, असा दावा आयुक्तांनी केला आहे.
खड्ड्यांवर शोधा रामबाण उपाय
सर्व २४ वॉर्डांतील सहायक आयुक्तांना अशा हमखास खड्ड्यात जाणाऱ्या रस्त्यांची यादी बनवून ती परिमंडळ उपायुक्तांकडे द्यावी लागणार आहे. ही यादी त्यांच्यामार्फत रस्ते विभागाच्या प्रमुखांकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर हे खड्डे कायमस्वरूपी कसे बुजवायचे यावर अभ्यास करून रामबाण उपाय शोधण्याचे आदेश आयुक्तांनी रस्ते विभागाला दिले आहेत.
असा सुरू झाला खड्ड्यांचा वाद
मुंबईचे रस्ते खड्ड्यात असताना प्रशासनाच्या हास्यास्पद आकडेवारीने नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. मुंबईत केवळ ३५ खड्डे असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केल्यामुळे सर्वच स्तरातून नाराजीचे सूर उमटू लागले.
मुंबईतील खड्डे अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी मनसेने रस्ते विभागाच्या प्रमुख अभियंत्याच्या हातात, मी या खड्ड्यासाठी जबाबदार असल्याचा फलक देऊन रस्त्यावर उभे केले. याच्या निषेधार्थ अभियंत्यांनी काम बंद आंदोलन पुकारले