पीडितांना आर्थिक मदतीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:08 IST2021-02-06T04:08:13+5:302021-02-06T04:08:13+5:30
पीडितांना आर्थिक मदतीसाठी संवेदनशीलतेने कार्यवाही करा - ॲड. यशोमती ठाकूर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मनोधैर्य योजना व बळी ...

पीडितांना आर्थिक मदतीसाठी
पीडितांना आर्थिक मदतीसाठी
संवेदनशीलतेने कार्यवाही करा
- ॲड. यशोमती ठाकूर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनोधैर्य योजना व बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसानभरपाई योजना (व्हिक्टिम कंपेन्सेशन स्कीम) नुसार पीडितांना अर्थसाहाय्य गतीने मिळेल यासाठी यंत्रणेने संवेदनशीलरीत्या कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी दिले.
मनोधैर्य योजना, व्हिक्टिम कंपेन्सेशन स्कीम, अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमच्या अनुषंगाने पीडितांच्या पुनर्वसनासाठी तसेच अर्थसाहाय्याच्या अनुषंगाने प्रलंबित प्रकरणांचा आढावा मंत्री ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव इद्झेस कुंदन, गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) विनीत अग्रवाल, महाराष्ट्र विधिसेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव ए. जे. मंत्री, महिला व बाल विकास उपायुक्त दिलीप हिवराळे, आदी उपस्थित होते.
ॲड. ठाकूर म्हणाल्या की, ‘कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ला तसेच अनैतिक कारणांसाठी मानवी व्यापार, आदी गंभीर प्रकरणातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी तत्काळ मदत देणे आवश्यक आहे. तांत्रिक कारणांमुळे कोणतीही मदत अडकून राहता कामा नये. यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, महिला व बालविकास अधिकारी, पोलीस विभाग तसेच या प्रकरणात बाजू मांडणारे सरकारी अभियोक्ता यांच्यात सुसंवाद राहिला पाहिजे. जिल्ह्यात दाखल अशा प्रकरणांचा दरमहा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे पथक बनवून कार्यवाहीला गती द्यावी. मनुष्यबळाचे नियमित प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे.