अखेर खारघर पोलीस ठाण्याची नवी इमारत खुली

By Admin | Updated: October 4, 2014 01:36 IST2014-10-04T01:36:25+5:302014-10-04T01:36:25+5:30

मागील तीन महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या खारघर पोलीस ठाण्याचे शुक्रवारी पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

Finally, the new building of Kharghar Police Station opened | अखेर खारघर पोलीस ठाण्याची नवी इमारत खुली

अखेर खारघर पोलीस ठाण्याची नवी इमारत खुली

>नवी मुंबई : मागील तीन महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या खारघर पोलीस ठाण्याचे शुक्रवारी पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी खारघरमधील नागरिक, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
अत्याधुनिक प्रशस्त पोलीस ठाण्यात तळ मजल्यावर 14 व पहिल्या मजल्यावर 14 अशा एकूण 28 खोल्या या ठिकाणी आहेत. त्यात कारागृह, लहान मुलांसाठी पाळणाघर, रेकॉर्ड रूम, संगणक खोली, कंट्रोल रूम, तपास कक्ष, पुरु ष, महिला कारागृह आदींसह पोलिसांना सुसज्ज कामकाज करण्यात मदत होईल. यासाठी विविध सोयीसुविधा या नवीन ठाण्यात देण्यात आल्या आहेत. जुन्या पोलीस ठाण्यात जागेची मोठी कमतरता भासत असल्याने पोलिसांना अपु:या जागेत कामकाज करावे लागत होते. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठविला होता. सुसज्ज पोलीस ठाण्याची नागरिकांची प्रतीक्षा संपली असून, शुक्रवारी ही नवी इमारत खुली करण्यात आली. 
खारघर सेक्टर 7मधील भूखंड क्र मांक 23 - ए हा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने प्रत्येक नागरिकाला पोलीस ठाण्यात पोहोचणो सहज शक्य होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी परिमंडळ 2चे उपायुक्त संजय ऐनपुरे, सहायक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी, खारघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी पाटील, कामोठेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमावर, सिडकोचे जनसंपर्कअधिकारी मोहन निनावे व  नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 
खारघर पोलीस ठाण्याची नवीन वास्तू शहराच्या मध्यभागी असल्याने या ठाण्यात सर्वाना पोहोचणो सहज शक्य होणार आहे. खारघरमधील नागरिकांना उद्भवणा:या समस्यांचा या ठिकाणी योग्य प्रकारे निपटारा होईल. 
- के.एल. प्रसाद, पोलीस आयुक्त : नवी मुंबई  

Web Title: Finally, the new building of Kharghar Police Station opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.