...अखेर कृषी विभागाला आली जाग
By Admin | Updated: December 7, 2014 23:33 IST2014-12-07T23:33:36+5:302014-12-07T23:33:36+5:30
शेंद्रुण येथे जवळपास ५० ते ५५ शेतकऱ्यांनी कारली, काकडी, विविध प्रजातींच्या मिरच्या, वांगी, चवळी या भाजीपाल्याची अंदाजे ६५ ते ७० एकर क्षेत्रामध्ये लागवड केली आहे.

...अखेर कृषी विभागाला आली जाग
भातसानगर : शेंद्रुण येथे जवळपास ५० ते ५५ शेतकऱ्यांनी कारली, काकडी, विविध प्रजातींच्या मिरच्या, वांगी, चवळी या भाजीपाल्याची अंदाजे ६५ ते ७० एकर क्षेत्रामध्ये लागवड केली आहे. यामध्ये भेंडीवगळता सर्वच भाजीपाल्यावर शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार घुबड्या रोगाचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
या घटनेचे वृत्त लोकमतने ४ डिसेंबर रोजी ‘भाजीपाला उत्पादक धास्तावले’ या मथळ्याखाली छापल्यानंतर कृषी यंत्रणा खडबडून जागी होऊन ५ डिसेंबरला कृषी अधिकाऱ्यांनी कीटक शास्त्रज्ञांसह शेंद्रुण येथील भाजीपाला उत्पादकांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.
शहापूर तालुका कृषी अधिकारी अजय पाटील, किन्हवली मंडळ कृषी अधिकारी एस.एस. तमाखाने, कृषी सहायक एन.एम. पाटील यांनी कीटक शास्त्रज्ञांसह शेंद्रुण येथे भेट देऊन भाजीपाल्याची पाहणी केली.