अखेर त्या बांधकामांवर कारवाई
By Admin | Updated: June 4, 2015 05:10 IST2015-06-04T05:10:56+5:302015-06-04T05:10:56+5:30
इंदिरानगरमधील अनधिकृत बांधकामाविषयी लोकमतने वृत्त प्रसिद्ध करताच महापालिकेने तत्काळ सदर ठिकाणी कारवाई केली आहे.

अखेर त्या बांधकामांवर कारवाई
नवी मुंबई : इंदिरानगरमधील अनधिकृत बांधकामाविषयी लोकमतने वृत्त प्रसिद्ध करताच महापालिकेने तत्काळ सदर ठिकाणी कारवाई केली आहे. संरक्षण भिंतीला लागून सुरू असलेल्या झोपड्या हटविण्यात आल्या आहेत.
महापालिकेने येथील नाल्याच्या बाजूला संरक्षण भिंत बांधली आहे. भिंतीचे काम झाल्यानंतर काही जणांनी तेथे अनधिकृतपणे झोपड्या उभ्या करण्यास सुरवात केली होती. विटांचे पक्के बांधकाम सुरू केले होते. बांधकाम पूर्ण होत आले होते.
या बांधकामाविरोधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठविला होता. परंतु महापालिकेकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नव्हती. याविषयी लोकमतने वृत्त प्रसिद्ध करताच अतिक्रमण विभागाने बुधवारी तत्काळ त्या ठिकाणी कारवाई केली आहे. सर्व बांधकाम हटविले आहे.