नालेसफाई अंतिम टप्प्यात

By Admin | Updated: June 14, 2014 23:56 IST2014-06-14T23:56:06+5:302014-06-14T23:56:06+5:30

कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नाल्यांच्या सफाईचे काम सुरु असून येत्या दोन दिवसात ते पूर्ण होणार आहे

Final phase of NalceaFi | नालेसफाई अंतिम टप्प्यात

नालेसफाई अंतिम टप्प्यात

बदलापूर : कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नाल्यांच्या सफाईचे काम सुरु असून येत्या दोन दिवसात ते पूर्ण होणार आहे. उल्हासनदीच्या तीरावर बदलापूर शहर असल्याने पूर परिस्थितीत नागरिकांना त्रास होणार नाही या हेतून सर्व नाल्यांची अधिका-यांच्या निरिक्षणखाली सफाई सुरु आहे.
कुळगांव-बदलापूर नगरपरिषद हद्दीत मांजर्ली, हेंद्रपाडा, बेलवली, वालिवली, कात्रप, शिरगांव, कुळगांव, कात्रप डिपी रोड, रेल्वे रुळाला लागून असलेला आदी प्रमुख नाल्यांची सफाई सर्वात आधी करण्यात येत आहे. तीन जेसीबी आणि दोन पोकलेन यंत्राद्वारे ही सफाई होत आहे. दरवर्षी नाल्यातील काढलेला गाळ हा लगेच उचलला जात नसल्याने दरवर्षी तोच गाळ पावसाने पुन्हा नाल्यात जाण्याचे प्रकार घडत होते. ही समस्या लक्षात घेऊन आरोग्य सभापती राजन घोरपडे यांनी नाल्यातील गाळ लागलीच उचलण्याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Final phase of NalceaFi