फिल्मीस्टाईलने 35 लाख लुटले
By Admin | Updated: August 17, 2014 02:08 IST2014-08-17T02:08:42+5:302014-08-17T02:08:42+5:30
दोन चोरांनी तेथील दोन सुरक्षा रक्षकांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या तोंडावर रूमाल लावून बेशुद्ध केले आणि सुमारे 35 लाख रुपयांची रोकड लंपास केली़

फिल्मीस्टाईलने 35 लाख लुटले
>मुंबई : साकीनाका येथील एका दुकानात दोन चोरांनी तेथील दोन सुरक्षा रक्षकांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या तोंडावर रूमाल लावून बेशुद्ध केले आणि सुमारे 35 लाख रुपयांची रोकड लंपास केली़ साकीनाका फार्म रोडवरील बुकर्स होलसेल प्रा़ लि़ या दुकानात ही चोरी शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास झाली़
साकीनाका येथे दोन चोर दुकानात शिरले आणि त्यांनी सुरक्षा रक्षकांना बेशुद्ध करुन बांधून ठेवले आणि दुकानातील 35 लाख 65 हजार 96क् रुपयांची रोकड घेऊन पळ काढला़ थोडय़ाच वेळात या दुकानात काम करणारे मंगेश मोहिते तेथे पोहोचल़े तेव्हा सुरक्षा रक्षक बांधलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आल़े त्यांनी तात्काळ दुकानातील तिजोरीकडे धाव घेतली़ त्यावेळी मोहिते यांना तिजोरीतील पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल़े त्यांनी तात्काळ पोलीस ठाणो गाठले व दोन अज्ञात चोरांविरोधात गुन्हा नोंदवला़