Join us  

चित्रपट निर्माते तुलसी रामसे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 2:33 AM

बॉलिवूडमध्ये हॉरर सिनेमांचा ट्रेंड आणणारे निर्माते, दिग्दर्शक तुलसी रामसे यांचे शुक्रवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्यामुळे मुंबईत निधन झाले.

मुंबई : बॉलिवूडमध्ये हॉरर सिनेमांचा ट्रेंड आणणारे निर्माते, दिग्दर्शक तुलसी रामसे यांचे शुक्रवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्यामुळे मुंबईत निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. शुक्रवारी संध्याकाळी छातीत दुखू लागल्याने त्यांना कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुरुवातीला दिग्दर्शक गोविंद यादव यांच्यासोबत रामसे यांनी अनेक वर्षे काम केले. पुराना मंदिर, तहखाना, वीराना, बंद दरवाजा हे त्यांचे हॉरर सिनेमे प्रचंड गाजले. रामसे यांना सहा भाऊ होते. रामसे ब्रदर्स नावाने त्यांचे सिनेमे प्रदर्शित होत असत. हॉरर सिनेमांचा ट्रेंड सर्वप्रथम बॉलिवूडमध्ये रामसे बंधूनीच रुजवला. हॉरर सिनेमांचा बादशहा ही त्यांची ओळख होती.

टॅग्स :बॉलिवूड