Join us
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांत खड्डे भरा; अन्यथा गय नाही, नितीन गडकरींचा दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 06:20 IST

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील खड्डे : नितीन गडकरी यांचा अधिकारी आणि कंत्राटदारांना दम

मुंबई : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील खड्डे येत्या आठ दिवसांत खड्डे भरा अन्यथा गय नाही, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्रीनितीन गडकरी यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना दम दिला आहे. ब्रिजेश पटेल यांनी पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गासह या दोन रस्त्यांना जोडणाऱ्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर पडलेल्या खड्ड्यांबाबत टिष्ट्वटरवर पोस्ट केली होती. त्या पोस्टची दखल घेत, गडकरी यांनी अधिकाऱ्यांनी खड्डे भरण्याचे आदेश दिले.

ब्रिजेश पटेल यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत एक टिष्ट्वट केले आहे. यात पटेल यांनी म्हटले होते की, पूर्व द्रुतगती आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाºया जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे या मार्गावर मोठी वाहतूककोंडी होते. ते तुम्हाला का माहीत नाही, केवळ मार्केटिंग तुम्हाला जिंकण्यासाठी मदत करणार नाही. तर तुम्हाला खरोखर काम करावे लागेल, असे नमूद करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि मुंबई महापालिकेला टॅग केले होते.

या पोस्टवर गडकरी यांनी औरंगाबाद ते सिलोड ते जळगाव महामार्गाची दयनीय अवस्था आल्याचे लक्षात आले आहे. या मार्गासह मुंबईतील रस्त्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग, महाराष्ट्र विभाग मुख्य अभियंता व मुंबईतील रस्तेवाहतूक अधिकाºयांना तत्काळ कारवाई करा, तसेच येत्या आठ दिवसांत रस्त्याची स्थिती सुधारा अन्यथा गय केली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया नोंदविली आहे.मुंबईसोबत राज्यातील इतर रस्त्यांच्या स्थितीचा नेटकाºयांनी पाढा वाचला. पंकज पाटील म्हणाले की, औरंगाबाद सिल्लोड रोडवर आम्ही दररोज प्रवास करतो, साधारण दीड वर्षांपासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. साधारण सहा महिन्यांत रस्ता पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती, परंतु अद्याप या रस्त्याचे काम झाले नाही. कंत्राटदाराने रस्ता खोदल्याने अनेक खड्डे पडले आहेत.वैभव रामदासी यांनी म्हटले की, पुणे ते सातारा महामार्गावर अनेक ठिकाणी उड्डाण पुलाचे काम अर्धवट आहे. तुमचे खाते इतके दिवस काय करत आहे. खेड शिवापूर जवळ मोठे खड्डे पडले आहेत. लोकांना गृहीत धरणे बंद करा अन्यथा निवडणुकीत नुकसान होईल.यात स्वत: लक्ष घाला!औरंगाबाद ते सिल्लोड हा रस्ता खूप खराब झाला आहे. या मार्गावरून प्रवास करताना लोकांना खूप मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यावर खूप अपघात होतात आणि लवकर रुग्णवाहिकासुद्धा येऊ शकत नाही. कृपया या गोष्टीकडे आपण स्वत: लक्ष घालून या रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे, असे दिनेश झालटे म्हणाले.

टॅग्स :नितीन गडकरीमुंबईरस्ते सुरक्षारस्ते वाहतूक