Join us

म्हाडाच्या २२६४ घरांसाठी ६ जानेवारीपर्यंत भरा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 07:21 IST

३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता लॉटरी काढली जाणार आहे.

मुंबई : म्हाडाच्या २२६४ घरांच्या लॉटरीसाठी ६ जानेवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज भरण्याकरिता ११ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली. ७ जानेवारी रोजी रात्री ११.५९ पर्यंत अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करता येणार आहे. 

लॉटरीसाठी पात्र अर्जांची यादी २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. तर २४ जानेवारी रोजी सायंकाळी लॉटरीत सहभाग घेणाऱ्या अर्जांची यादी प्रसिद्ध होईल. ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता लॉटरी काढली जाणार आहे. 

टॅग्स :मुंबईम्हाडा