अश्लील चाळे करणाऱ्या मौलवीविरूद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: August 17, 2016 03:28 IST2016-08-17T03:28:34+5:302016-08-17T03:28:34+5:30
मानखुर्द महाराष्ट्र नगरच्या इंदिरानगर परिसरात असलेल्या मदरसामधील दोन विद्यार्थीनीवर तेथील मौलवीकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली

अश्लील चाळे करणाऱ्या मौलवीविरूद्ध गुन्हा दाखल
मुंबई : मानखुर्द महाराष्ट्र नगरच्या इंदिरानगर परिसरात असलेल्या मदरसामधील दोन विद्यार्थीनीवर तेथील मौलवीकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. यामध्ये ४ आणि ६ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. याप्रकरणी मौलवीविरोधात पॉस्को, विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.
इंदिरानगर परिसरात असलेल्या मदरसामध्ये अनेक मुली शिक्षण घेतात. तेथेच ४ वर्षाची प्रिया आणि ६ वर्षाची मिर्झाही (नावात बदल) शिक्षण घेते. मंगळवारी सायंकाळी ४ वाजता वर्गातील सर्व मुली निघून गेल्यानंतर तेथील मौलवीने दोघींना वर्गात थांबण्यास सांगितले. त्यानंतर दोघींसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी रडण्यास सुरुवात केली. दोघींचा आवाज स्थानिकांपर्यंत पोहचताच त्यांनी मदरसाकडे धाव घेतली. स्थानिकांनी त्याला बेदम चोप देत ट्रॉम्बे पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली जात होती. स्थानिक आमदार तुकाराम काते यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस यंत्रणेवर दबाब आणला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)