प्राचार्याविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

By Admin | Updated: September 11, 2015 02:07 IST2015-09-11T02:07:46+5:302015-09-11T02:07:46+5:30

अंधेरी पूर्वच्या एका नामांकित शाळेच्या प्राचार्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉस्कोंतर्गत बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शाळेतील एका विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे

Filed under POSCO against Principal | प्राचार्याविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

प्राचार्याविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई : अंधेरी पूर्वच्या एका नामांकित शाळेच्या प्राचार्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉस्कोंतर्गत बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शाळेतील एका विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वच्या पूनमनगर परिसरात ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेतील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या सहा वर्षीय मुलासोबत शाळेच्या प्राचार्याने अश्लील चाळे केले. ज्यामुळे हा मुलगा घाबरला होता. हा प्रकार ३१ आॅगस्ट रोजी घडला. तणावात असलेल्या मुलाच्या पालकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर बुधवारी रात्री त्यांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पॉस्कोअंतर्गत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सूत्रांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या सहा वर्षीय मुलासोबत शाळेच्या प्राचार्याने अश्लील चाळे केले. ज्यामुळे हा मुलगा घाबरला होता. हा प्रकार ३१ आॅगस्ट रोजी घडला.

Web Title: Filed under POSCO against Principal